Tuesday, May 6, 2008

Marathi Mulgi

*मराठी मुली*
===================================================
मराठी मुली
कंपनीमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमध्ये मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते

===================================================

हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?...

... अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता... हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
===================================================

यशाच्या मार्गावर नेहमीच 'अंडर कन्स्ट्रक्शन'ची पाटी लटकत असते......
===================================================

* ' सदैव' आणि 'कधीच नाही'

हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.
===================================================

* पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!

===================================================

* माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत... तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा... तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!

===================================================

का? का? का?

१. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?

२. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?

३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का?

४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का?

===================================================

Heigth of Optimism

99 वर्षांची म्हातारी जेव्हा 'हच का नया लाइफटाइम रिचार्ज' घेते!

===================================================

आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.

आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!
===================================================

जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत

जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्‍या जुन्या गाड्यांच्या डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची आहे. किती किंमत येईल ?
तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !
===================================================

मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला.

त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत.

त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद

"जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ;

तेव्हा मला फ़ार गंमत वाटते .

त्याला हृदय नसतं ;

आणि

तिला डोके नसतं ...."
===================================================