Monday, May 5, 2008

Marathi TP

नकार देणे ही कला असेल . पण , होकार देऊन काहीच करणे , ही त्याहून मोठी कला आहे .

******************************

***************************************************

आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो .

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो , तो शहाणा असतो .

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो , तो नवरा असतो !!!

***************************************************

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात .

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो .

एका पक्ष्याला गोळी लागते . तो खाली कोसळतो .

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात .

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो ...

..
का ?

..


अंगात मस्ती , दुसरं काय ?

********************************************************

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते , असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच . त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते !!!!

**************************************************************************************************

हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं !!!

******************************************************

अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच . त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं , '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना , जे तू पाहायला नको होतं ?''

त्यानं उत्तर दिलं , '' पाहिलं . ''

कानावर हात ठेवून तिनं विचारलं , '' काय पाहिलंस ?''

'' आपले बाबा !!!! ''

*********************************************

तुफान पाऊस पडतोय ...

तुला वाटत असेल

छान बाहेर पडावं

भिजून चिंब होत

पाणी उडवत

गाणं गाताना

कुणीतरी खास भेटावं ...

हो ना ?

अरे , हो म्हण ना , लाजायचं काय त्यात ?

प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात !!!

*****************************************